लक्ष्मी..

लक्ष्मी..

आज माजघर शांत आहे सुन्न बसलंय स्वयंपाकघर, चुलीची धग लागत नाहीये कारण चवताळलाय ज्वाळांचा वावर.. आज बांगड्या नाहीत किणकिणणाऱ्या ना दिसला साडीचा पदर, कपाळावरलं कुंकूही दिसेना अन् एकाकी राहिला मंगळसूत्राचा सर.. असाच गेला दिवस ओशाळली दुपार, भरीस भर म्हणून आली तिन्हीसांज.. पेटला नाही दिवा तुळशीवृंदावन रितं, देवही बसले अंधारात देवघरही झालं परकं.. सरली संध्याकाळ उगवली […]

निनावी

निनावी

भीती वाटते लेखणी हातात घ्यायला, कोऱ्या कागदाने शाईच प्यायली तर? पांढरा कागद निळा होईल, कृष्णासारखा ! आणि झिरपेल त्यावर माझी प्रत्येक भावना, उघड होईल माझं मन, आजवर दडवून ठेवलेलं फुलपाखरू. लोकं वाचतील, चर्चा होतील, टीका करतील, थोरवी गातील माझ्या लेखनाची… पण नकोय मला हे, मला बोलायचंय कुठल्याही मापात न झुकता, कोणत्याही चष्म्यातून न पाहता. कागद […]